कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष भास्कर सावंत, संदेश उर्फ गोटया सावंत सेवा शक्ती संघर्ष यांच्यामार्फत तसेच भाजप कामगार मोर्चा यांच्या प्रयत्नांतून गुरुवार दि. 22 ऑगस्ट 2024 रोजी कणकवली आगारातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना त्यांच्या पाल्ल्यान सहित शालेय वह्या वाटपाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी प्रस्तुत सेवाशक्ती संघर्ष कर्मचारी संघ यांच्या वतीने संपन्न झाला.
सदर वेळी कामगार नेते अशोक राणे जिल्हाध्यक्ष भाजप कामगार मोर्चा आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, संतोष भाट, कार्याध्यक्ष डेपो अध्यक्ष मनोज कुमार पवार, उपाध्यक्ष गुरुप्रसाद सामंत, विराज पोईपकर, संकेत फोंडेकर, अनिल पवार, विश्वासराव वाघमारे, जीएफ जाधव इतर पदाधिकारी उपस्थित होते सदर प्रसंगी शालेय विद्यार्थी तसेच त्यांचे पालक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.