कथाकथन स्पर्धेत पार्थ,धम्मातेजा, मनस्वी प्रथम !

पळसंब शाळा नंबर १ चे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्रावण केंद्रातील शाळांची जिल्हा परिषद शाळा पळसंब नंबर १ शाळेत कथाकथन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उदघाट्न सरपंच महेश वरक, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष रविकांत सावंत, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते दिपप्रज्वन करून करण्यात आले. स्पर्धेत गट १ (१ ली ते ३ री) मध्ये पार्थ सुनील वेदरे- प्रथम ( श्रावण नं.१), यशवंत सिद्धार्थ परब-द्वितीय क्रमांक- ( पळसंब नं१) जान्हवी सिद्धार्थ कदम- तृतीय क्रमांक (आडवली नं. १) तर भविका घाडीगावकर ( त्रिंबक नं.२) गट २ (४ थी ते ५ वी) प्रथम क्रमांक – धम्मातेजा पल्लव कदम ( आडवली न १),
द्वितीय क्रमांक – ऋतिका रुपेश परब (श्रावण न १), तृतीय क्रमांक – भक्ती सुरेद्र सुर्वे( त्रिंबक बगाडवाडी ), उत्तेजनार्थ स्वरा रविकांत सावंत ( पळसंब न १). गट क्रमांक ३ (६ वी ते ७ वी ) प्रथम क्रमांक- मनस्वी पल्लव कदम (आडवली न १), द्वितीय क्रमांक- प्रचिती प्रशांत गवस (श्रावण न १), तृतीय क्रमांक-लावण्या नागेश साटम (त्रिंबक हायस्कूल), उत्तेजनार्थमृण्मयी संतोष परब (पळसंब न १) सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

यावेळी केंद्रप्रमुख देवू जंगले, सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, मुख्याध्यापक विनोद कदम, सुत्रसंचालन अपूर्वा कदम, सोनटक्के मॅडम, हजारे सर अमित त्रिंबककर व केद्रातील शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन अपूर्वा कदम यांनी तर आभार विनोद कदम, परिक्षण एकनाथ गायकवाड सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!