मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडेंची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : आगामी गणेश उत्सवापूर्वी शहरातील स्वच्छता व रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांनी वाभवे वैभववाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेप्पला आहे. या उत्सवासाठी वैभववाडी बाजारपेठेत मोठी गर्दी होते. मात्र वैभववाडी बाजारपेठेची दैनिय अवस्था झाली आहे. बाजार पेठेतील गटारे खोदून ठेवली आहेत. त्यामुळे चिखल झाला असून गटारात पाणी साचले आहे. याचा शहरातील व्यापारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सगळीकडे अस्वच्छता आहे. बाहेरून येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी जागा नाही. तर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. गटारे भरली आहेत. त्यातून पाण्याचा निचारा होत नसल्यामुळे मच्छर प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच त्यामुळे दुर्गधी पसरली आहे. या ठिकाणी फॉग मशीन चा वापर केला जात नाही शहरातील अनेक स्ट्रीट लाईट बंद स्वरूपात आहेत गणेश गात परिसर अस्वच्छ आहे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत खाजगी बॅनर लावल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला सेल्फी पॉईंट व त्यालाच लागून असलेला चौकाची दुरावस्था झाले आहे नगरपंचायतीने याची योग्य ती दखल घेऊन आगावी गणेशोत्सवापूर्वी शहरातील समस्या दूर कराव्यात अशी मागणी तावडे यांनी लेखी निवेदनाद्वारे केले आहे.