खारेपाटण (प्रतिनिधी): बँक ऑफ महाराष्ट्र शाखा – खारेपाटण च्या शिवाजीपेठ येथील नवीन ए टी एम सेंटर चे उद्घाटन खारेपाटण बाजारपेठेत नुकतेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे डेप्युटी झोनल मॅनेजर श्री आनंद दिगणकर यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिक व व्यापारी श्री मधुकर देवस्थळी यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
या कार्यक्रमाला खारेपाटण गावच्या सरपंच सौ प्राची ईसवलकर,आय टी ऑफिसर गोवा चे. श्री नितीन, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण चे शाखाधिकारी श्री मनीष झा, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव, संदेश धुमाळे,संकेत शेट्ये,सुकांत वरूणकर,नंदकिशोर कोरगावकर, संजय धाक्रस,अनंत देवस्थळी,सुधीर कुबल,लियाकत काझी,प्रमोद मोहीरे, अतुल देवस्थळी,देवानंद ईसवलकर तसेच बँक ऑफ महाराष्ट्र खारेपाटण शाखेचे कर्मचारी श्री दीपा रानडे,श्री दिनकर नर, जिष्णू के एस,अमोल गुरव,श्री पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण च्या वतीने श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला सर्व ग्राहक व हीतचींतक तसेच व्यापारी बांधव व खारेपाटण नागरिक उपस्थित होते.तर खारेपाटणच्या नवनिर्वाचित सरपंच सौ प्राची ईसवलकर यांचा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटणच्या वतीने झोनल मॅनेजर श्री आनंद दिगणकर यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुषपगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या नवीन ए टी एम केंद्राला ग्रामस्थांनी व उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.