नगरपंचायत जुने भाजी मार्केट पटवर्धन चौकनजिकचे पब्लिक टॉयलेटवर हातोडा

सोनगेवाडीतील जनता घाण आणि दुर्गंधीने त्रस्त

नगरपंचायतने फिरते शौचालय सारखी पर्यायी व्यवस्था करावी – सुजित जाधव

कणकवली (प्रतिनीधी) : नगरपंचायत जुने भाजी मार्केट पटवर्धन चौकनजिक असलेला एकमेव सार्वजनिक शौचालय तोडायला घेतले आहे. शौचलयाआभावी बाजारपेठेतील सर्व व्यापारी वर्ग आणि नागरिक यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायतने भाजी विक्रेते, फिरते व्यापारी तसेच कणकवलीतील नागरिकांसाठी तात्पुरत्या तरी शौचालयाचे व्यवस्था करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव यांनी केली आहे.

सध्या कणकवली शहरामध्ये एकही स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने प्रत्येकाला कणकवली बस स्टॅन्डवर स्वच्छतागृहासाठी जावे लागते. यामुळे विशेषतः महिलांची गैरसोय होत आहे. नगरपंचायतमधील सत्ताधारी कणकवलीतील जनतेला नवीन नवीन आमिषे दाखवण्याचे काम गेली 10 वर्षे करत आहेत, परंतु जनतेची प्राथमिक गरज पूर्ण न करता फक्त जनतेला फिल्मी दुनिया प्रसार माध्यमातून दाखवून आपण विकास केला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आमदार नितेश राणे यांनी 5 वर्षापूर्वी सत्ता द्या विकास करतो असे, असे सांगितले. तो हाच काय विकास ? कणकवलीतील झालेला विकास सत्ताधारी जाहीर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.


आता येणाऱ्या मे महिन्यात चाकरमान्यांची गर्दी वाढणार असुन, त्यांची गैरसोय होणारच. सोबतच नगरपंचायत जुने भाजी मार्केटमध्ये व आजुबाजुच्या सोनगेवाडीतील परिसरात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य निर्माण होणारच आहे. नवीन स्वच्छ्ता गृह उभारणीसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असुन, या कालावधीत कणकवलीतील व्यापारी आणि नागरिक यांनी जायचे कुठे? याचा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. त्यासाठी सरकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी किंवा नगरपंचायत अधिकारी यांनी यावर काहीतरी तोडगा काढणे गरजेचे आहे. सोबतच होणारी गैरसोय लक्षात घेता जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या लवकर काम पुर्ण करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!