कै.अपिशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ गौरव गवाणकर यांचा उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व अपिशेठ गवाणकर यांचे अलीकडेच निधन झाले.कै. अपिशेठ गवाणकर हे कणकवली शहर तसेच परिसरात निःस्वार्थी भावनेने आर्थिक मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित होते. कै. अपिशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव गौरव गवाणकर यांनी कणकवली शहरातील सर्पमित्रांना आज मोफत टीशर्ट वाटप केले. सर्पमित्र हे आपला जीव धोक्यात घालून साप पकडत असतात. हे सामाजिक कार्य करताना पदरमोड करून कुठलीही आर्थिक अपेक्षा न करता सर्पमित्र काम करतात. त्यांच्या सामाजिक कार्याला हुरूप यावा म्हणून गौरव गवाणकर यांनी मोफत टीशर्ट वाटप केले. यावेळी जय शेट्ये, वैभव मालंडकर, नार्वेकर उपस्थित होते.