गणेशोत्सवानिमित्त पाच हजार कुटुंबियांना स्वखर्चाने पूजा व प्रसाद साहित्याचे वाटप
कणकवली (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यावर्षीही संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांच्याकडून , नाटळ व हरकुऴ जि प मतदार संघा सोबतच कणकवली तालुक्यातील 5000 ( पाच हजार) कुटुंबियांना पूजेचे साहित्य आणि प्रसादाच्या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.या साहित्यामध्ये साखर, तेल, मैदा, रवा, गूळ, अगरबत्ती धूप, कापूर आदि साहित्याचा समावेश आहे. साहित्याचे वाटप सुरु झाले असून दोन दिवसात पाच हजार कुटुंबियांना घरोघरी जाऊन या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यांच्या या दातृत्वा बद्दल सर्व ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या उक्ती नुसार संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्याकडून दरवर्षी गणपती उत्सवा सोबतच दिवाळी,क्रिसमस व ईद निमित्ताने ज्या समाजाचा सण असेल त्या समाजात साहित्याचे वाटप करण्यात येते.