महाराष्ट्र एसटी कामगारांच्या बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलकांना युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा पाठिंबा

कणकवली एसटी स्टँड येथे कर्मचाऱ्यांना भेट देत दिला पाठिंबा

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समिती प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांचा बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलन. कणकवली एस. टी स्टैंड च्या बाहेर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी एस. टी कर्मचाऱ्यांना भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व आपला पाठिंबा दिला. यात रा. प कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित रद्द करा. रुपये ४८४९ कोटींमधील उर्वरित रक्कम अदा करा. मुळवेतणात दिलेल्या रु ५, ०००, ४,०००, २,५०० मुळे झालेल्या विसंगती दूर करण्यासाठी सरसकट ५,००० द्या अश्या मागण्या कर्मचाऱ्यांनी संपात मांडल्या आहेत. आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करणार असे आश्वासन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, निसार शेख, विनय राणे, एच. बी. रावराणे, एच. बी कावले, नंदकुमार घाडीगावकर, एच. बी. पवार, संतोष भाट, एस. एस. राणे, संतोष नर, अनिल नर, दिलीप जाधव, प्रकाश वालावलकर, उदय मसुरकर, सामंत, बाबा ईस्वलकर, एस पी. सुतार आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!