कणकवली प्रतिनिधी) : भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस. देशात हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, त्याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या ‘जनजागृती सेवा संस्था ठाणे (रजि) या सामाजिक संस्थेने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळा जानवली नं. 1 ता. कणकवली येथील जि.प.शाळेतील शिक्षकांचा जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, जेष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी (वेतोबा, गाव गाता गजाली, फेम) संस्थेच्या सदस्या गंधाली तिरपणकर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सर्व शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करुन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सिध्देश कांबळी, सौ.अक्षता कांबळी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्यावतीने मुख्याध्यापक प्रसाद कांबळी, पदवीधर शिक्षक वृषाली सावंत, लतिका राणे, उपशिक्षिका विद्या परब, अंगणवाडी सेविका अर्चना गवळी या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच अभिनेत्री व समाजसेविका अक्षता कांबळी यांनीही शिक्षकांच्या कार्याबद्दल व संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले.सूत्रसंचालन वृषाली सावंत यांनी केले, प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रसाद कांबळी यांनी केले, तसेच लतिका राणे व विद्या परब यांनी जनजागृती संस्थेला शुभेच्छा दिल्या. वृषाली सावंत यांनी मान्यवरांचे तसेच संस्थेचे आभार मानले.