कुर्ली सुतारवाडी येथे गणपती विसर्जन घाटाचे अरुण पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्ती ही समाजाची देणे असते,आपण ज्या समाजातमध्ये मोठे झालो त्या समाजासाठी काही तरी केले पाहिजे, या भावनेतून गणपती विसर्जन घाट बांधला आहे, असे प्रतिपादन कुर्ली उत्कर्ष मंडळ मुंबई चे माजी सरचिटणीस अरुण शिवराम पाटील यांनी केले. आई कै.काशीबाई शिवराम पाटील यांच्या स्मरणार्थ गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या वेळी जयश्री पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद पाटील, वसंत पाटील, बि. टी. चव्हाण,विनय पाटील, पुरोहित रघुनाथ कुलकर्णी, प्रकाश पडवळ, आबासाहेब कदम, रुपेश पवार, मारुती वैराग, हेमंत फोंडेकर, ठेकेदार सचिन पाटील, कृष्णात पाटील, महादेव पाटील, रामदास पवार, विलास परब आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे कुर्ली सुतारवाडी -भातडेवाडी या दोन वाडीतील लोकांच्या गणपतीचे विसर्जन तलावात करण्यासाठी गणपती विसर्जन घाट अरुण पाटील यानी स्वखर्चाने बांधला आहे. गणपती विसर्जन घाट बांधल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने होते.

error: Content is protected !!