दरवर्षी प्रमाणे शिंगुदेवी युवा मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन, १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान व शिंगुदेवी युवा मंडळ कोकिसरे बांधवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबीराची सुरवात झाली. या रक्तदान शिबिरात १९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. एस एस पी एम हॉस्पिटल रक्तपेढी च्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल,सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेश पडवळ, प्रशांत ढवण, शिंगुदेवी युवा मंडळ अध्यक्ष प्रवीण पाळये, संकेत परबते, अनिकेत धवाळे,विक्रम परबते, गणेश धुमक,सुरज धुमक,गजानन ढुकरूळ आदी कार्यकर्ते रक्तदाते उपस्थित होते.

error: Content is protected !!