मालवणचे सुयोग पंडित यांची पहिली कादंबरी ‘सुक्या सुंगटाची कढी’ झाली प्रकाशित..!

वरीष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांची प्रस्तावना तर बिग बाॅस फेम ज्येष्ठ अभिनेते पॅडी कांबळे यांनी केली आहे मलपृष्ठावरील पाठराखण

विघ्नेश पुस्तक भांडार कणकवली यांचे प्रकाशन तर ज्येष्ठ चित्रकार बलराम सामंत व दर्शन सामंत यांनी साकारले कादंबरीचे मुखपृष्ठ

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे लेखक सुयोग पंडित यांची पहिली कादंबरी ‘सुक्या सुंगटाची कढी’ प्रकाशित झाली आहे. संपूर्ण मालवणी बोलीभाषेतील ही पहिलीच कादंबरी मानली जात असून वरीष्ठ पत्रकार व संपादक विजय शेट्टी यांची या कादंबरीला प्रस्तावना लाभली आहे. बिग बाॅस फेम व हास्यजत्रा कार्यक्रमातील लोकप्रिय आभिनेते पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे यांनी या कादंबरीच्या मलपृष्ठावर पाठराखण केली आहे.

मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे कलाशिक्षक व ज्येष्ठ चित्रकार बलराम सामंत व त्यांचे चिरंजीव दर्शन सामंत यांनी या कादंबरीचे मुखपृष्ठ साकारले आहे. कणकवली येथील विघ्नेश गोखले यांच्या ‘विघ्नेश पुस्तक भांडार’ यांच्या द्वारा ‘सुक्या सुंगटाची कढी’ या पहिल्या वहिल्या संपूर्ण मालवणी कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले आहे.

ही कादंबरी वाचकांना खरेदीसाठी उपलब्ध झाली असून यासाठी ‘विघ्नेश भरत गोखले, विघ्नेश पुस्तक भांडार, ओम साई भालचंद्र काॅम्प्लेक्स, कणकवली, जि सिंधुदुर्ग’ यांच्याशी मोबाईल क्र. ९४२२३७९३२०’ या क्रमांकावर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे. मालवणी मुलखातील बहुधार्मिक संस्कृतीवर ही कादंबरी आधारीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!