खारेपाटण संभाजीनगर व गुरववाडी येथील सर्विस रोडसाठी ग्रामस्थांनी केली मागणी

नोव्हेंबर पर्यंत काम न झाल्यास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण संभाजीनगर व गुरववाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांच्याकडे गेल्या एक वर्षांपूर्वी सर्व्हिस रोड ची मागणी केली होती. या ठिकाणी शाळेतील मुलं व गावातील नागरिकांची जास्त रहदारी असल्या करणाने येथे अपघात होण्याची शक्यता आहे. आज युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव व खारेपाटण संभाजी नगर व गुरववाडीतील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग – खारेपाटण येथे धडक दिली. यावेळी सुशांत नाईक यांनी फोन वरून शिवणीवार साहेब व कुमावत यांच्याशी चर्चा केली. येत्या नोव्हेंबर पर्यत जर या संभाजीनगर व गुरववाडी येथील ग्रामस्थांशी सर्व्हिस रोड चे काम पूर्ण नाही झाले तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव, निखिल गुरव, सूर्यकांत गुरव,शशिकांत गुरव, सुरज गुरव, मोहन गुरव, दीपक गुरव, सुरेंद्र गुरव व संभाजीनगर, गुरववाडी येथील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!