एकाच शाळेच्या सहा विद्यार्थिनी विभागीय स्तरावर
कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा सन २०२४ नुकतीच कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे संपन्न झाली. या स्पर्धेवर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेने दरवर्षी प्रमाणे आपले वर्चस्व राखले व स्पर्धेची चॅम्पियनशीप पुन्हा एकदा प्राप्त केली सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण २५० पेक्षा जास्त कॅरम खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रशालेतील एकूण ६ विद्यार्थिनी विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. या स्पर्धेत कोणत्याही एका शाळेचे सर्वाधिक यशस्वी स्पर्धक कनेडी हायस्कूलचेच आहेत हे विशेष. सदर स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे –
१४ वर्षाखालील मुली –
दिव्या नंदकिशोर चव्हाण (तृतीय क्रमांक – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी)
१७ वर्षाखालील मुली –
कु. परिणिता विजय गावकर (द्वितीय क्रमांक – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी), श्रेया राजेंद्र महाडिक (तृतीय क्रमांक – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी)
१९ वर्षाखालील मुले –
गौरव संदीप पवार (षष्ठ क्रमांक – तुकाराम शिवराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कनेडी)
१९ वर्षाखालील मुली –
दिक्षा नंदकिशोर चव्हाण (प्रथम क्रमांक – तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स, कनेडी)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्वांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे संस्कृत तथा इंग्रजी विषय शिक्षक व राज्यस्तरीय कॅरम पंच मकरंद आपटे,जिल्ह्यातील प्रसिद्ध कॅरम खेळाडू गौतम यादव व क्रीडा शिक्षक बयाजी बुराण यांचे मार्गदर्शन लाभले.