कणकवली (प्रतिनिधी) : हळवल परबवाडी येथील दशरथ बाळकृष्ण परब ( वय ३३ ) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी काल १२ सप्टेंबर रोजी दुपारी निधन झाले. दशरथ यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आणि प्रामाणिक होता. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिणी, काका, काकी, वहिनी, पुतणे, पुतण्या, भावोजी, भाचे – भाची, असा परिवार आहे. पत्रकार उमेश परब यांचे ते सख्खे भाऊ होत.
हळवल परबवाडी येथील दशरथ परब यांचे निधन












