ठाकरे सेनेला खारेपाटण विभागात मोठा धक्का

युवा उद्योजक रुपेश सावंत शिवसेनेत दाखल

मंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर शिवसैनिक खारेपाटण गावचे सुपुत्र तथा डोंबिवली येथील उद्योजक रुपेश सावंत यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, माजी खा. सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथे शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. कणकवली येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात सावंत यांनी पक्षप्रवेश केला. उद्योजक रुपेश सावंत यांचा पक्षप्रवेश हा खारेपाटण विभागात शिवसेनेला उभारी देणारा तर ठाकरे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. खारेपाटण विभागात अडीचशे हुन अधिक महिलांना मार्लेश्वर, गणपतीपुळे सहल घडवीत मोफत देवदर्शन ची सोय रुपेश यांनी स्वखर्चाने करून दिली होती. खारेपाटण विभागात होत असलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यात रुपेश यांचा नेहमीच आर्थिक सहकार्याचा हात असतो.खारेपाटण विभागात कोव्हीड काळात कोव्हीड केअर सेंटर ला लाखोंचा निधी त्यांनी दिला होता.धार्मिक, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात नेहमीच निःस्वार्थीपणे सहकार्य करणारे अग्रणी व्यक्तीमत्व म्हणून रुपेश सावंत यांची ओळख आहे. रुपेश सावंत यांच्या पक्षप्रवेशाने खारेपाटण विभागातील शिवसेनेला बूस्टर डोस मिळाला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, विधानसभाप्रमुख संदेश पटेल, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, सुनील पारकर, बाळू पारकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, कुडाळ तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, राजा गावकर, बबन शिंदे, किसन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे,महिंद्र सावंत, विश्वास गावकर, किसन मांजरेकर, वैभववाडी तालुकाप्रमुख संभाजी रावराणे, भास्कर राणे, निलेश तेली, प्रशांत वनस्कर , शरद वायंगणकर,दामू सावंत, गुरू शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!