आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावडेवाडी येथील राहिवासी चारुशीला बाळा गांवकर यांचे आज रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजप मालवण उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष मंगेश गांवकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने दुःख व्यक्त करण्यात येत आहे.