खारेपाटण कोष्टीआळी येथे आढळला ९ फुटी अजगर

सर्प मित्र भक्ती पिसे हिचे कौतुक

मोठ्या कौशल्याने पकडलेल्या अजगरला दिले जीवदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील कोष्टेआळी येथे शनिवार दि. १४/९/२०२४ रोजी रात्री ८.३० च्या दरम्यान सुमारे ९ फुट लांब असलेला अजगर असल्याची माहिती मिळताच खारेपाटण येथील सर्प मित्र युवती कु.भक्ती किशोर पिसे वय – २२ वर्षे हिने मोठ्या कौशल्याने या भल्या मोठ्या अजगराला पकडून जंगलात अज्ञात वासात सोडून देऊन त्याला जीवनदान दिले.तर सर्पमित्र कु.भक्ती पिसे हिने अजगर पकडण्यासाठी केलेल्या डेरिंग चे सर्वत्रच कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
खर तर आपल्याला समाजात आज सर्प मित्र सर्वत्र आढळता.परंतु त्यामध्येही एखादा सर्प मित्र ही एक महिला किंवा युवती असेल तर सर्वानाच या गोष्टीचे कुतूहल वाटल्याशिवाय राहणार नाही. खारेपाटण मध्ये अवघ्या कमी वयात सरपटणाऱ्या प्राण्याशी मैत्री करून त्यांना अलगद आपल्या हातातील कौशल्याने व हिमतीने अगदी सहज रित्या पकडणारी डेरींगबाज गर्ल म्हणून जिची ओळख आहे अशी कु.भक्ती पिसे ही खारेपाटण दशक्रोशीत नव्याने सर्प मित्र म्हनुन उदयास येत असून आता पर्यंत तिने अनेक जंगली विषारी व बिनविषारी साप याना पकडले आहे. हे कौशल्य किंवा कला तिने स्वतः आत्मसात केली असून अनुभवातून आपण हे शिकले असल्याचे सर्प मित्र कुमारी भक्ती पिसे हिने यावेळी सांगितले.
खारेपाटण येथे नागरी वस्तीत पकडण्यात आलेला ९ फूट लांबीचा अजगर कुमारी भक्ती पिसे हिने स्वतः प्रयत्न करून पकडला असून त्याचे सुमारे २५ किलो वजन असल्याचे यावेळी सांगण्यात आहे.कुठूनही मदतीसाठी फोन आल्यावर कुमारी भक्ती पिसे ही त्या ठिकाणी तातडीने धाऊन जाते. व जंगली सरपटणाऱ्या प्रण्याना पकडून त्यांना जंगल भागात अज्ञात वासात सोडून देते. भक्ती हिच्या या सामाजिक कार्यात तिचे वडील किशोर पिसे व भाऊ यश पिसे हे देखील तिला मदत करत असल्याचे यावेळी सर्पमित्र भक्ती पिसे हिने सांगितले.तसेच कोंडये,ता.राजापूर, जि.रत्नागिरी येथील प्रसिद्ध सर्प मित्र श्री पंकज कोंडकर यांचे देखील कु.भक्ती पिसे हिला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. संकटकाळी मदतीच्या वेळी धावून जाणारी सर्प मित्र कु.भक्ती पिसे जंगली साप पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत घेत नाही.तिच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

error: Content is protected !!