कुरंगावणे मांजरेकरवाडी कडे जाणारा पूर्वापार रस्ता बंद केल्याने नागरिकांना मध्ये नाराजी

पेट्रोलपंप करीता शाळेकडे व मांजरेकर वाडी जाणारा रस्ता बंद

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कुरंगावणे,मांजरेकरवाडी कडे पूर्वापार जाणारा रहदारीचा रस्ता सदर जागेत पेट्रोल पंप निर्माण करण्यात येणार असल्याच्या कारणास्तव संबधित जमीन मालकाने कोणतीही पूर्व सूचना स्थानिक रहिवाशी व ग्रामस्थांना न देता सदर रस्ता बंद केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मांजरेकर यांनी दिली.

याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे येथून थेट कुरंगवणे मांजरेकरवाडी येथे जाणारा रस्ता स्थानीक नागरिकांना विश्वासात न घेता अचानक पणे बंद करून तात्पुरता दुय्यम दर्जाचा रस्ता बनविला जात होता.ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर दी.१५ सप्टेंबर २०२४ रोजी संबधित वाडीच्या ग्रामस्थानी एकत्र येत ही माहिती कुरंगावणे गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे व उपसरपंच बबलू पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.तसेच नडगिवे गावच्या सरपंच सौ माधवी मण्यार यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली.तर स्थानिक नागरिक व सरपंच महोदय यांनी संबधित जागेत प्रस्तावित असलेल्या पेट्रोल पंप मालकाला याबाबत जाब विचारला असता पेट्रोलपंप मालकाने असमाधान कारक उत्तरे दिल्याने तसेच कुठल्याही प्रकारची शासन मान्यता न घेतल्याने कुरांगावणे ग्रामपंचायतीच्या वतीने मांजरेकर वाडी कडे पूर्वापार जाणारा रस्ता बंद करण्याचे रचण्यात आलेले कट कारस्थान बंद पाडून सदर रस्ता पूर्ववत सुरू करावा असे आदेश दिले.

तर सदर रस्ता हा फक्त मांजरेकर वाडी पुरता मर्यादित नसून हा रस्ता नडगिवे येथे असलेल्या इंग्लिश मिडीयम स्कूल कडे जाणाऱ्या शालेय विद्यार्थी व शिक्षक तसेच पालकांना उपयुक्त ठरत असून शालेय स्कूल बस या मर्गावरून येत जात असतात. तसेच खारेपाटण चींचवली हा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्यावर खारेपाटण येथील हसोळटेंब कोंडवाडी येथील नागरिकांना देखील आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडत आहे.तर सन १९९० साला पासून रस्ता सुरू असून सुमारे ३० वर्षीपेक्षा अधिक वर्षे या रस्त्याला झाली असून स्थानिक ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या अधिकार शेत्रात हा रस्ता येत असल्याचे देखील येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मात्र मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे येथे हायवेला लागून प्रस्तावित होत असलेल्या पेट्रोलपंप मालकाने स्थानिक नागरिकांना कुठलीच पूर्व सूचना न देता पारंपरिक रस्ता अचानक बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

तर यामुळे इंग्लिश मिडीयम मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत असून येथील स्थानिक नागरिकांनी अखेत पूर्वीचा पारंपरिक रस्ता जेसीबी च्या साहय्याने तोडण्याचे सुरू असलेले काम रोखून बंद पाडले.व जोपर्यंत आम्हाला आमचा मूळ रस्ता मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थानी यावेळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!