गावातील सर्व विकास कामे आगामी काही काळात पूर्ण होणार, बेरोजगारीचा प्रश्न सोडविणार: किरण (भैय्या) सामंत यांची ग्वाही
लांजा (प्रतिनिधी) : सिंधुरत्न समृद्ध योजनेचे कार्यकारी समितीचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण भैय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव – हसोळ मधील हसोळ गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी किरण भैय्या सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गावाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. गावाची सगळी विकासाची कामे आगामी काही काळात पूर्णत्वास येतील. इथला बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या पक्ष प्रवेशामध्ये कमलाकर लक्ष्मण यशवंतराव ग्रुप ग्रामपंचायत सदस्य, संदीप पाटील ग्रामस्थ, राजेंद्र जाधव, विलास जाधव, मारुती गुजर, अशोक गुजर, तुकाराम गुजर, आदींनी पक्ष प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, महिला विधानसभा क्षेत्र प्रमुख सौ. मानसी आंबेकर, उपतालुका प्रमुख सुजित आंबेकर, युवा सेना तालुका अधिकारी राजू धावणे, विभाग प्रमुख दिनेश पवार, बाबा भिंगार्डे, संदीप राड्ये, शंकर गोरे, सरपंच अनुष्का कातकर, विलास चाळके, भगवान चाळके, संतोष चाळके, सुहास चाळके, गणेश चाळके, मनोहर बने, अरुण लाड, संतोष सावंत, राजेश चाळके, विजय लाड, रवींद्र लाड, परशुराम चाळके आदी मान्यवर उपस्थित होते.













