आमदार नितेश राणे यांनी खारेपाटण येथे किशोर माळवदे यांच्या घरी घेतले गणेश दर्शन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी उशिरा खारेपाटण – तळेरे विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत घरघुती गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यासवेत कणकवली तालुका भाजप ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर हे उपस्थित होते. दरम्यान खारेपाटण रामेश्वर नगर येथे पंचायत समिती माजी सदस्य तृप्ती माळवदे व खारेपाटण गावचे माजी सरपंच किशोर माळवदे यांच्या घरी आमदार नितेश राणे यांनी सदिच्छा भेट देत त्यांच्या घरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.यावेळी भाजप कार्यकर्ते शेखर कांबळे व किशोर माळवदे यांचे चिरंजीव आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!