कुडाळ विकास समितीची आज सायंकाळी सहविचार बैठक
कुडाळ (प्रतिनिधी) : ओरोस येथील जिल्हा रुग्णालय येथे शासकीय मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय कार्यान्वित नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कुडाळ येथे ग्रामीण रुग्णालय ईमारत निर्लेखित करून ग्रामीण रुग्णालय आवारात अद्ययावत जिल्हा रुग्णालय व्हावे जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांवर योग्य इलाज होतील यासाठी कुडाळ विकास समिती च्या वतीने रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता सहविचार बैठक श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा बाजारपेठ कुडाळ येथे आयोजित केली आहे. तरी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळ विकास समिती च्या वतीने करण्यात आले आहे.












