फोंडाघाट मारुतीवाडी येथे एक दिवशीय अखंड हरिनाम सप्ताह शनिवार २८ सप्टेंबर रोजी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रतिवर्षाप्रमाणे मारुतीवाडी येथील श्री हनुमान मंदिरामध्ये ” एक दिवशीय अखंड हरिनाम सप्ताह ” ( जागर ) शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी घटस्थापना, आरती, शालेय भजने, वारकरी हरिपाठ, जीवनविद्या मिशन शाखा – फोंडा तर्फे उपासना यज्ञ,विविध स्थानिक कार्यक्रम, स्थानिक भजने, रात्री दहा वाजता- तिरंगी भजनाचा जंगी सामना होणार आहे.यामध्ये बुवा सुशांत जोईल, कातवण – देवगड, व सुजित परब, कणकवली- हरकुळ बुद्रुक, आणि व्यंकटेश नर, उंडील-देवगड यांच्यामध्ये हा ट्वेंटी-ट्वेंटी चा भजन सामना रंगणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक हनुमान मंदिर, फोंडा आणि सावंत – पटेल परिवार यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!