उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला, माता-भगिनींना न्याय मिळवून दिलेला, सुरक्षिततेची भावना निर्माण केली
त्यामुळे विरोधकांच्या नसा नसात भरलेला दावा भाऊंचा द्वेष उफाळून येतोय
मातोश्री वरील पॉर्न स्टारला आधी आवरा नाहीतर त्याचे चित्रपट गावागावात दाखविणार
आमदार नितेश राणे यांनी दिले इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : होय…! आमचे देवा भाऊ आहेतच सिंघम..! कारण त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला, माता-भगिनींना न्याय मिळवून दिलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केलेली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी मधील बेशरम लोक बदलापूर प्रकरणातील नराधमाची बाजू घेऊन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेवर टीका करत आहेत. महाराष्ट्र राज्यातील माता भगिनी सुरक्षित असल्याची भावना राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झाली.त्यामुळे देवा भाऊ बद्दलचे प्रेम, आदर जनता व्यक्त करू लागली आणि त्यामुळेच विरोधकांच्या नसा नसात भरलेला द्वेष उफाळून येतो, हे संजय राऊत याच्यासारख्या महाविकास आघाडीतील झाकण झुल्या कडून दिसून येतो. अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली ते ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे बोलत होते. ते म्हणाले,बदलापूर मधील बलात्कारी नराधमाचे पोलिसांनी संरक्षणासाठी केलेल्या एन्काऊंटरचे राज्यात सर्वत्र कौतुक होत असताना महाविकास आघाडी मधील बेशरम लोकांची टोळी या नराधमाचे समर्थन आणि बाजू घेऊन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर टीका करत आहेत. याला कारण देवा भाऊने महाराष्ट्रातील जनतेला महिला आणि माता भगिनींना न्याय मिळवून दिलेला आहे.राज्यातील महिला भगिनींच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण झालेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे पहावत नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दलचा द्वेष या उफाळून येतो. त्यातूनच ते एन्काऊंटरचे समर्थन करण्यापेक्षा नारधामाची बाजू घेवून बेशरम लोक लोकांप्रमाणे बोलत आहेत.
मुळात संजय राऊत यांनी महिलांवरील अत्याचार अन्याय याविषयी बोलूच नये.कारण त्यांचेवर डॉ. पाटकर नावाच्या महिलेला छळले ,धमकावेल, तिच्या घरावर दारूच्या बाटल्या मारल्या तिच्या अंगावर कुत्रे सोडले असा आरोप आहे. अशा राऊत त्याने महिला आत्यचारा वर बोलू नये. आधी त्या महिलेची माफी मागावी पॉर्न फिल्म आणि मालकाच्या मुलाचा पॉर्न स्टार ठाकरे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो. आधी त्याला आवर नाहीतर त्याचा चित्रपट गावागावात मला मोठ्या स्क्रीनवर दाखवावा लागतील. असा इशारा यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.