पँरँलिसिस झालेल्या स्थीतीत वाट चुकलेल्या चाँदखाँ पठाण यांना सिंधुदुर्ग सिव्हिल हाँस्पिटल व पोलीस स्टेशन द्वारा संविता आश्रमात केले होते दाखल
खारेपाटण (प्रतिनिधी) : चाँदखाँ पठाण वय वर्षेः७३ हे वार्धक्य आणि पँरँलिसिस व स्मृतीभ्रंशाने ग्रासलेले गृहस्थ चाँदखाँ पठाण जालना येथे राहतात. ते दि.२१ जुलै,२०२४ रोजी जालना येथून मुंबईकडील नातलगांकडे जायला निघाले मात्र स्मृतीभ्रंशामुळे वाट चुकले आणि मुंबईला न पोहचता ते थेट पोहचले सिंधुदुर्ग मध्ये मात्र सविता आश्रमाच्या मदतीने नुकतेच या आजोबांच्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांचे पुनर्मिलन घडवून आणण्यात आले आहे.
याबाबत सिंधुदुर्ग सिव्हिल हाँस्पिटलचे वैद्यकीय आधिकारींनी रस्त्यावरील निराधारांसाठी कार्य करीत असलेल्या जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमचे संस्थापक संदिप परब यांना संपर्क करून चाँदखाँ यांना आश्रमात दाखल करून घेण्याची विनंती केली. चाँदखाँ यांना सिंधुदुर्ग पोलीस स्टेशनद्वारे दि.२ सप्टेंबर रोजी संविता आश्रमात आश्रय आणि पुढिल उपचारासाठी दाखल केले. आश्रमातील उपचारांनी व सेवा सुश्रुषेने चाँदखाँ यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली. संविता आश्रमचे विश्वस्त किसन चौरे यांचेसह संविता आश्रम टिममधील बांधव शिवा , भक्ती परब, माधव पाटिल , सोनाली साटम यांच्या टिमने दोन दिवस पँरँलिसिसमुळे बोबडे व अस्पष्ट बोलणा-या चाँदखाँशी संवाद साधून त्यांचे गाव आष्टी व जिल्हा जालना असल्याचे समजून घेतले.
गुगल सर्चद्वारे जालना पोलीस कंट्रोल व जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती कक्षाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. अखेर आष्टी गावचे माजी सरपंच अक्तर अब्दुल शेख यांचा संपर्क नंबर मिळवून त्यांचेमार्फत नातलगांशी यशस्वी संपर्क केला. चाँदखाँ पठाण हे आजोबा संविता आश्रमात असल्याचे समजताच तात्काळ त्यांचे भाऊ अख्तर इब्राहिमखान पठाण, मुलगी रेश्मा सलिम शेख व कुटुंबिय शेख बशीर,शहेनशाह शेख, ख्वाजा शेख हे जालना येथून आश्रमात पोहचले. व आज त्यांनी चाँदखाँ यांना ताब्यात घेवून घरी नेले. वार्धक्य , पँरेलिसिस व स्मृतीभ्रंशाने आजारी असलेल्या वयोवृध्द आजोबांना त्यांचे कुटुंबिय मिळाल्याने उपस्थीत सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.