अबकी बार राज सरकार….. 

मनसेची कणकवली,देवगड आणि वैभववाडी विधानसभा कार्यकारणी बैठक संपन्न

कणकवली विधानसभा २६८चे संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे यांची उपस्थिती 

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा कार्यकारणी ची बैठक आज दिनांक 27 ऑकटोबर 2024 रोजी देवगड बर्वे लायब्ररी सभागृहात पार पडली यावेळी देवगड कणकवली विधानसभा 268 चे संपर्क अध्यक्ष संतोष भाऊ शिंगाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केले यामध्ये देवगड,वैभववाडी, आणि कणकवली तालुका हा नैसर्गिक दृष्ट्या सर्व संपन्न तालुका या विधानसभा क्षेत्रात प्रामुख्याने वर्षानुवर्षे शिक्षण विषयक, पर्यटन विषयक, आरोग्य विषयक अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यातील प्रमुख मुद्देसूद विवरण पुढील प्रमाणे : देवगड,कणकवली, वैभववाडी तालुक्यामध्ये उत्तम आरोग्य व्यवस्था नाही, एखादा रुग्ण अपत्कालीन स्थितीत असेल तर अजूनही तालुक्याला गोवा, कोल्हापूर, मुंबई शिवाय पर्याय नाही… देवगड ग्रामीण रुग्णालय अजूनही अद्यावत सुख सोयीपासून वंचीत…. देवगड तालुक्यात शैक्षणिक दृष्टीने देवगड कॉलेज व्यतिरिक्त तालुक्यातील विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाकरिता अन्य कोणताही मार्ग नाही तसेच सदर देवगड कॉलेज मध्ये डिग्री शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने तालुक्यातील मुलांना पुणे-कोल्हापूर-मुंबई शिवाय पर्याय नाही.देवगड तालुक्याची जलवाहिनी आणि अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे, यामुळे देवगड-जामसंडे शहरासहीत तालुक्यातील काही भागामध्ये 5/6 दिवसांनी एकवेळ पाणीपुरवठा होतो, शासनाकडून ठिक ठिकाणी प्रसारित केलेल्या कुपनलिकांची परिस्थिती चिंता जनक असून काही ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत दिसून येतात, शासन पुरस्कृत जलजीवन मिशन ची कामे अर्धवट स्थितीत आहेत. देवगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या रस्ते तसेच पोट-रस्त्यांची चाळण झाली असून श्री देव कुणकेश्वर कडे जाणारा रस्ता काही भागात मातीचाच आहे, जलजीवन मिशन च्या भोंगळ कारभारामुळे रस्ता खचल्याचे कित्येकदा पाहण्यात येते, विधानसभा निवडणूक लढण्याचा आदेश असेल किंवा नसेल तरी सर्व महाराष्ट्रा सैनिक तसे पदाधिकारी वर्गाने पूर्ण ताकदीनिशी जनतेच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा तसेच आता प्रमाणे ज्या पद्धतीत संघटना बांधणी झाली तशा पद्धतीने उर्वरित भागातही संघटना बांधणीवर  भर द्यावा  याचप्रमाणे अधिकाधिक जनसंपर्क वाढवून विधानसभा पातळीवरती अधिक संघटनात्मक काम करावे, आदरणीय राज साहेबांचा आदेश असेल किंवा नसेल तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपलं प्राबल्य दाखवून अधिकाधिक  संपर्क जपावा यावेळी उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, विधानसभा प्रसिद्धी माध्यम प्रमुख महेश नलावडे  जिल्हा सहसचिव अनंत आचरेकर कणकवली तालुका तालुकाध्यक्ष शांताराम सादये, कणकवली तालुका संपर्काध्यक्ष विश्राम लोके  वैभववाडी तालुका अध्यक्ष महेश कदम देवगड तालुकाध्यक्ष रुपेश पांगम देवगड उपतालुकाध्यक्ष  हेमंत मोंडकर देवगड शहराध्यक्ष सचिन राणे  कातवन विभाग अध्यक्ष नंदकुमार हाडकर विधानसभा विद्यार्थी सेनेचे अनिकेत तर्फे देवगड विद्यार्थी सेनेचे पुरुषोत्तम जाधव कट्टा शाखाध्यक्ष कट्टा शाखाध्यक्ष  विराज जावकर इत्यादी  पदाधिकारी तसेच बहुसंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!