गावातील 30 महिलांना मिळाला लाभ
कणकवली (प्रतिनिधी) : स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचे निमित्त साधून ग्रामपंचायत कोळोशीच्या 15 वित्त आयोगच्या निधीमधून गावातील महिलांसाठी कापडी पिशव्या बनवणे याचे प्रशिक्षण कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्या मदतीने नुकतेच आयोजित करण्यात आले .हे प्रशिक्षण दोन दिवस आयोजित करण्यात आलेले होते यावेळी गावातील निवडक 30 महिलांना कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले संस्थेच्या श्रीमती चव्हाण व श्रीमती माईनकर यांनी महिलांना प्रशिक्षण दिले.प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच गुरुनाथ आचरेकर ,उपसरपंच अतुल गुरव ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे ग्रामपंचायत सदस्य सुशील इंदप सिद्धार्थ तांबे सानिया इंदप मीनाक्षी जाधव अनुजा आचरेकर आदी तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे शशिकांत कासले हे उपस्थित होते यावेळी महिलांनी सदरचे प्रशिक्षण आपल्याला पुढील व्यवसाय करण्यासाठी उपयोगी पडेल अशी भावना व्यक्त केली व प्रशिक्षण संस्था आणि ग्रामपंचायत यांचे आभार व्यक्त केले प्रशिक्षणाचे समारोपप्रसंगी प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी माजी सरपंच रितिका सावंत , सान्वी चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी संतोष तावडे पूर्वा तांबे सिद्धेश पवार यांचे सहकार्य लाभले.