वन्यजीव निसर्गसाखळी चा महत्वाचा घटक – वनपाल धुळू कोळेकर

फोंडाघाट वनपरीमंडळाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वन्यप्राणी हा निसर्गसाखळी मधील अत्यंत महत्वाचा घटक आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्व वन्यप्राण्यांचे महत्व अनमोल आहे आई प्रतिपादन फोंडाघाट वनपरिमंडळ चे वनपाल धुळू कोळेकर यांनी केले. राज्य शासनाच्या वतीने 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. वन्यजीव सप्ताहच्या निमित्ताने वनपरिमंडळ फोंडाघाट च्या वतीने हरकुळ खुर्द येथील माध्यमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.यादव, सर्व शिक्षक , फोंडाघाट वनरक्षक अतुल खोत, वनरक्षक अंकुश माने, वनसेवक बागवे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना वन्यजीव सप्ताह निमित्ताने चित्रफिती च्या माध्यमातून वनपाल कोळेकर यांनी मार्गदर्शन केले. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष या चित्रफितीतून दाखवतानाच मनुष्य आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कसा टाळता येईल ? याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मनुष्याप्रमाणेच वन्यजीव हेही निसर्ग साखळी चा अविभाज्य घटक आहेत. वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष टाळणे शक्य असून यासाठी ककनते उपाय करायला हवेत याबाबत वनपाल कोळेकर यांनी उपस्थितांना मौल्यवान मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!