आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन – कृषि विभागामार्फत भात पिकांवरील किड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत भात पिकावरील किडरोग नियंत्रण कार्यशाळा बिडवाडी- कासारवाडी येथील शेतकरी पुंडलिक सावंत यांच्या येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाला कृषि विज्ञान केंद्र किर्लोस येथील शास्त्रज्ञ डॉ.भास्कर काजरेकर यांनी भात पिकांवरील किड व रोग तसेच सेंद्रीय शेती याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन पिक परिसंस्था निरीक्षणे घेण्यात आली. तसेच कृषि सहाय्यक श्रीम.जान्हवी चव्हाण यांनी कृषि विभागातील विविध योजनांची माहिती याप्रसंगी शेतकऱ्यांना दिली.
यावेळी किर्लोस येथील शास्त्रज्ञ डॉ.श्री.काजरेकर, कणकवली तालुका कृषी अधिकारी शांतीनाथ पवार, कृषी पर्यवेक्षक श्रीम.निरवडेकर, कृषि सहाय्यक श्रीम.जान्हवी चव्हाण तसेच शेतकरी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.