आरक्षणाला विरोध करणे हा भाजपा चा छुपा अजेंठा

राहुल गांधीच वक्तव्य अभ्यास पूर्ण

कणकवली (प्रतिनिधी) : राहुल गांधी यांनी जो पर्यंत सामाजिक विषमता संपत नाही तो पर्यंत आरक्षण राहील असे वक्तव्य केले आहे . सामाजिक समानता प्रस्थापित होईल तेव्हा आरक्षणाची गरज राहणार नाही असे वक्तव्य केले आहे ते अगदी बरोबर आहे असे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संदीप कदम यांनी केले आहे .

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सामाजिक समानता प्रस्थापित होईपर्यंत आरक्षणाची गरज आहे असे म्हटले आहे त्यामुळे राहुल गांधींचे वक्तव्य हे बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याशी मिळते जुळते आहे खऱ्या अर्थाने भाजपा पक्ष हा खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवत आहे . भापजा सरकारने अनेक सरकारी उद्योग विकून आरक्षित प्रवर्गातील बांधवांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे . त्याचप्रमाणे संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात 15 लाख शासकीय नोकऱ्या शासन स्तरावरून उपलब्ध आहेत मात्र त्या भरती संदर्भात भाजपा पक्ष काहीच बोलत नाही त्यामुळे हजारो आरक्षित समाज बांधव नोकऱ्यापासून वंचित राहिले आहेत . भाजपाने मंडळ आयोगाला प्रचंड विरोध करून ओबीसीच्या आरक्षणा विरोधात भुमिका घेतली . भाजपाचा पूर्व इतिहास आरक्षणाबाबत नेहमीच त्यांनी विरोध केला आहे . भाजपाच्या अमित शहा यांनी संसदेमध्ये आरक्षणाला विरोध केला आहे . त्या बाबत अनेक व्हीडीओ उपलब्ध आहेत . सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बेंचेस वाटप प्रकरण , जिम घोटाळा आणि सोलर लॅम्प या समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय निधीचा अपव्यय झाला आहे हे झाकण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरक्षण बचाव परिषद घेवुन जनतेची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे . मात्र शाहु फुले आंबेडकर चळवळीतील जनता सुज्ञ आहे त्यांना राहुल गांधी काय बोलले आणि त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ काय आहे हे त्यांना समजते त्यामुळे आरक्षण बचाव परिषद घेतल्याने या निमित्ताने राहुल गांधीचे विचार घरोघरी पोहचुन त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल असे उपजिल्हाप्रमुख संदीप कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!