ज्ञानेश्वर मोरे यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या जिल्हा संपर्क अध्यक्षपदी नियुक्ती

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी ज्ञानेश्वर मोरे यांची मनसे विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. त्याच्याकडे वैभववाडी, कणकवली, देवगड आणि मालवण या चार तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याआगोदर ज्ञानेश्वर मोरे हे मनसे विद्यार्थी सेनेचे वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष होते. यावेळी मनविसे वाढीसाठी ज्ञानेश्वर मोरे यांनी प्रत्येक गावा-गावात दौरे केले आहे. त्याचेच श्रेय म्हणून आज अमित ठाकरे यांनी त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

अमित ठाकरे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर मोरे यांना मुंबई च्या राजगड मुख्य कार्यालयात पत्र देण्यात आले. प्रसंगी मनविसे प्रमुख संघटक यश सरदेसाई, प्रशांत कनोजिया, जिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे, कौस्तुभ वाडेकर, सचिन पाटणकर उपस्थित होते.

error: Content is protected !!