साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांची सतीश सावंत यांच्यावर टीका
आमदार नितेश राणेंवर टीका केल्यास यापुढे सडेतोड उत्तर देण्याचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख झालेले सतीश सावंत हे आपल्या गावापुरते व त्यांच्या शेजारी पत्रकार परिषदेला बसलेल्या त्यांच्या मेव्हण्यापुरतेच बहुदा जिल्हाप्रमुख झाले अशी शंका आता जिल्ह्यात नागरिकांना येऊ लागली आहे. कारण आजच्या पत्रकार परिषदेत सतीश सावंत यांनी साकेडी अंडरपास संदर्भात काम पुरे झाले नसल्याबाबत वक्तव्य केले. मात्र नारायण राणे यांच्या कृपेने सतीश सावंत यांनी करंजे येथे घेतलेल्या प्लॉटवर सतीश सावंत साकेडी मधून जात नसल्याने त्यांना हे सर्विस रस्त्याचे काम पुरे झाले हे माहिती नसावे. असा टोला साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी लगावला आहे. आमदार नितेश राणे यांनी सहा महिन्यापूर्वी आपल्या निवासस्थानी बैठक घेत साकेडी अंडरपासचे काम पूर्ण करून घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. व नुकतेच साकेडी अंडरपासच्या सर्विस रस्त्याच्या डांबरीकरणासह रस्ता खुला करण्याचे काम पूर्ण झाले. व या रस्त्यावरून सध्या वाहतूक देखील सुरू झाली आहे. परंतु जिल्हाप्रमुख झालेल्या व करंजे येथे फार्म हाऊस असलेल्या सतीश सावंत यांना या रस्त्याने करंजे येथे जाता येते हे बहुदा माहिती नसावे. त्यामुळे सतीश सावंत यांनी निदान एखाद्याने शब्द दिल्यानंतर काम पूर्ण केले तर त्याची माहिती करून घेऊन नंतरच त्याच्यावर टीका करावी. असा टोला प्रज्वल वर्दम यांनी लगावला. तसेच आमदार नितेश राणे यांच्या वर नाहक आरोप केल्यास सतीश सावंत यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देखील वर्दम यांनी दिला आहे