कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुन्या काळातील प्रसिद्ध असलेल्या छाया क्लिनिक या दवाखान्याचे मालक व जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉ. सुनील अनंत रेवडेकर (60) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा, असा परिवार आहे डॉ. सुनील रेवडेकर यांनी अनेक वर्ष छाया क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा केली. अनेकांची त्यांचे जवळचे संबंध होते.