देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात बापर्डे बौद्धवाडी येथील भारत मुरारी सकपाळ वय 50 आणि दारूच्या नशेत यांनी दारूच्या नशेत मध्यरात्री आई व व भाऊ याच्या दांड्याने ठेचून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळीच्या सुमारास उजेडात आली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी देवगड पोलीस दाखल झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत मुरारी सकपाळ ५० राहणार बापर्डे बौद्धवाडी , याला दारूचे व्यसन होते दारूच्या नशेतच त्याचा घरामध्ये आई व भाऊ यांच्याबरोबर वाद झाला होता त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास आई शोभा मुरारी सकपाळ वय 75 व भाऊ व मोठा भाऊ महेंद्र मुरारी सपकाळ वय 55 यांची झोपेत असताना दांड्याने ठेचून खून केला. दररोज सकाळी पाच वाजता उठणाऱ्या शोभा सकपाळ व त्यांच्या घरातली मंडळी अजून का उठली नाही म्हणून येथील ग्रामस्थ आणि याची माहिती गावचे सरपंच व पोलीस पाटील यांना दिली. सरपंच व पोलीस पाटील यांनी तात्काळ त्यांच्या घराकडे जात खिडकीतून असता आई व मुलगा मृत अवस्थेत घरात दिसली मात्र त्यांच्या दुसऱ्या मुलगा भारत मुरारी सपकाळ हा घरात नसल्याने त्याची शोधाशोध सुरू केली त्याची शोधाशोध सुरू असतानाच तो वापरणे तिला जंगलात सकाळी दहाच्या सुमारास सापडला . गावचे सरपंच व पोलीस पाटील यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनीच आई व भावाचा खून केला असल्याची कबुली त्याने त्यांच्याकडे दिली त्यानंतर सरपंच व पोलीस पाटील यांनी तात्काळ ही घटना पोलिसांना कळविले त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
भारत मुरारी सपकाळ यांनी यापूर्वीही दारूच्या नशेत 2007 साली आपली पत्नीचा हेल्मेटच्या साहाय्याने खून केला होता. त्याची शिक्षाही भारत याने भोगली होती.त्यांनी पत्नीचा खून केल्यानंतर त्याची मुले मात्र त्याच्याजवळ राहत नसून ती दोन्ही मुलं आपले मामा यांच्या जवळ राहत असल्याची माहिती मिळतेय.
डबल मर्डर ! दांड्याने ठेचून आई व भावाची निर्घृण हत्या
