आंबोली हिरण्यकेशी नदी उगम परिसर झाला चकाचक

फॉरेस्ट रेंजर अमित कटके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली स्वच्छता मोहीम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली येथील पर्यटन स्थळ हिरण्यकेशी नदीचा उगम येथे वनविभाग आंबोली तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आले वनक्षेत्रपाल अमित कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अंबोलीतील वनविभाग कर्मचारी वनमजूर वनरक्षक वनपाल सिंधुदुर्ग मानव वन्यजीव रक्षक काका भिसे आदी सहभागी झाले होते आंबोली मध्ये दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर तसेच पावसाळ्या दरम्याने पर्यटकांकडून करण्यात येत असलेला कचरा हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या ठिकाणी असलेली पवित्र नदी प्रदूषित होत आहे. तसेच जंगल परिसरात प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर साचून वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात येत असल्याचे वनक्षेत्रपाल अमित कटके यांनी सांगितले . त्यामुळे यापुढे सुद्धा सर्व पर्यटन स्थळे तसेच जंगलामध्ये साचलेला कचरा बाहेर काढला जाणार आहे व त्याची योग्य बिलेवाट लावली जाणार आहे असे सांगण्यात आले. यावेळी हिरण्यकेशी येथे आढळणारा शिष्टुरा हिरण्यकेशी या माशाचा अधिवास असलेले कुंड सुद्धा साफ करण्यात आले. वनविभागाच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!