संस्कारक्षम उपक्रमातून घडणारी पिढी, समाजातील आव्हाने झेलण्यास समर्थ-सरपंच संजना आग्रे.

फोंडाघाट- माळवाडी- हवेलीनगर शाळेत सरस्वती पूजन उत्साहात !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवात प्रत्येक शाळेमध्ये, सरस्वती पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भक्तीभाव आणि शिस्तपालनाचा संस्कार, या उत्सवातून प्रदर्शित होतो. त्यामुळे उत्साहाबरोबरच ज्ञानाची देवता सरस्वतीमातेला प्रसन्न करून, विविध कार्यक्रमाच्या सादरीकरणातून हा उत्सव फोंडाघाट मधील माळवाडी- हवेलीनगर या प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा झाला. प्रारंभी उद्योग जगतातील देव माणूस आदरणीय रतन टाटाजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्यानंतर सकाळी डॉक्टर नातू गुरुजी आणि सर्व गुरुजनांचे उपस्थितीत,श्री शारदामातेची एका विद्यार्थ्याने सर्व मुला मुलींच्या प्रतिनिधित्व स्वरूपात यथासांग पूजा केली. आरती- प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर मुला-मुलींनी विविध गुणदर्शनाचे, कलागुणांचे दर्शन घडविले.यामध्ये विविध प्रकारचे नाच,छोटुकल्या एकांकिका, मोबाईलचे दुष्परिणाम दर्शवणारी एकपात्री नाटिका आणि स्वच्छतेचे महत्व विशद करणारे नाटक सादर करून उपस्थित पालकवर्ग आणि ग्रामस्थांचे कौतुक मिळविले.

त्यांना सहशिक्षिका माधवी जोशी, शितल बागवे, भाग्यश्री पाताडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फोंडाघाट सरपंच संजना आग्रे यांनी उपस्थित राहून, मुलांचे अभिनंदन करताना, सरस्वती पूजन सारख्या संस्कारक्षम उपक्रमातून, घडणारी नवी पिढी, समाजातील आव्हाने झेलण्यास समर्थ ठरावीत, असा विश्वास व्यक्त करून, सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्नेहभोजन व प्रसाद होऊन उत्सवाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!