फोंडाघाट औद्योगिक संस्थेला, स्व.बापूसाहेब प्रभूगावकर यांचे नाव देण्यासाठी,दशक्रोशीतील जनतेची स्वाक्षरी होईल मोहीम !

नामांतरातून स्व.बापूसाहेब यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांचे कार्य पुढील पिढीसाठी दीपस्तंभ

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट (जिल्हा- सिंधुदुर्ग) च्या आयटीआय प्रशिक्षण संस्थेस तत्कालीन कणकवली- मालवण मतदार संघाचे माजी आमदार व नाम स्व. बापूसाहेब प्रभूगावकर यांचे नाव द्यावे,अशी आग्रही मागणी फोंडाघाट दशक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, आणि विद्यार्थीवर्गाने केली आहे. त्यावेळी मंत्री झाल्यावर शब्द दिल्याप्रमाणे अगदी प्रतिकूल परिस्थितीत स्व .बापूसाहेब यांनी फोंडाघाट मध्ये प्रथम जीटीआय (किमान कौशल्यावर आधारित) संस्थेस मंजुरी मिळवून, सुरू केले. त्यानंतर फोंडावासियांनी कवडीमोल दरात सुमारे दहा एकर जमीन दिल्यानंतर, जीटीआय संस्था सावंतवाडी येथे स्थलांतरित करून, अध्ययावत सहा ट्रेड्स सह, आयटीआय मंजुरी घेऊन चालू केले. आज ह्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्वतःची जमीन- इमारत- औद्योगिक लॅब सुरळीत चालू असून, शेकडो मुले शिक्षण घेऊन स्वयंपूर्ण होत आहेत.

ही संस्था निर्माण करण्यामागे स्व. बापूसाहेब यांचे संपूर्ण योगदान आहे. त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व आणि दिला शब्द पाळण्याच्या स्वभावामुळे, फोंडावासीय ऋणी आहेत. याची परतफेड व त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव,तसेच नवीन येणाऱ्या पिढीसाठी त्यांचे कार्य दीपस्तंभ ठरावे,या दृढनिश्चयाने फोंडाघाट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला कै. बापूसाहेब प्रभूगावकर यांचे नाव देण्यासाठी फोंडाघाटवासिय आग्रही मागणी करीत आहेत.

प्रशासनाने सुद्धा फोंडाघाट दशक्रोशीतील समस्त नागरिकांच्या वस्तुनिष्ठ मागणीचा अंतःकरण पूर्वक विचार करावा. आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता, स्व. बापूसाहेब प्रभूगावकर यांचे नाव कोंडाघाट औद्योगिक संस्थेत देण्याचा शासकीय आदेश तातडीने पारित करून, जनमताचा आदर करावा. असे निवेदन महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार,उद्योजकता, नाविन्य मंत्री नाम.मंगल प्रभात लोढा, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रत्ना-सिंधू चे खासदार नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, संचालक -औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचे कडे फोंडाघाटवासी यांच्या स्वाक्षऱ्यासह पोस्टाने आणि मेलद्वारे रवाना केले आहे. याची कृपया शासनाने सत्वर नोंद घेऊन, नामांतराचा आदेश काढून फोंडाघाटवासीयांच्या दिलासा द्यावा. अशी आग्रही विनंती करण्यात आली आहे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!