मालोंड बेलाची वाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पाच विकासात्मक कामांचे भूमिपूजन….

खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नामुळे निधी उपलब्ध..

मसुरे (प्रतिनिधी) : मालोंड बेलाचीवाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध विकासात्मक पाच कामांचे भूमिपूजन रविवारी सकाळी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यामध्ये मालोंड बेलाचीवाडी श्री देव नारायण मंदिर ते मुख्य रस्ता बंदिस्त गटार बांधणे- निधी तीन लाख रुपये पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मालोंड पूर्ण प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे-निधी चार लाख रुपये माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीने,मालोंड अंगणवाडी दुरुस्ती करणे निधी दोन लाख ५० हजार रुपये माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीने, मालोंड टेंबवाडी ते विठ्ठल मंदिररस्ता डांबरीकरण करणे- निधी पाच लाख रुपये खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने,मालोंड स्मशानभूमीत स्मशान शेड बांधणे- निधी पाच लाख रुपये,खासदार नारायण राणे,माजी खासदार निलेशराणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने निधी मंजूर झाला आहे.सदर कामे होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे येथील बूथ प्रमुख जितेंद्र परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, माजी सभापती अनिल कांदळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.तसेच या विकासात्मक कामांना भारतीय जनता पक्षाचे नेते दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, महेश मांजरेकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी सरपंच श्रीमती पूर्वी फणसगावकर,उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, माजी उपसभापती संजय ठाकूर,बुथ अध्यक्ष जितेंद्र परब,माजी उपसरपंच नाना परब, रवींद्र घाडीगावकर ,सुभाष घाडीगावकर ,कृष्णा मिस्त्री, दिगंबर आचरेकर,श्रीकांत मालोडकर,संतोष घाडीगावकर,रामचंद्र देवळी, अनुष्का परब( ग्रामपंचायत सदस्य), विवेकानंद घाडीगावकर,मधुकर घाडीगावकर, प्रशांत घाडीगावकर, दिलीप घाडीगावकर,आबा घाडीगावकर,आबा घाडीगावकर,बाबा तांडेल, पद्माकर फणसगावकर, बंटी परब गोविंद परब संदीप परब ,विश्वनाथ परब निलेश मसुरकर, दिपाली घाडीगावकर,सरिता परब,बाळा पारकर,दिलीप परब ,मकरंद कुंटे रघुवीर जांभेकर,रमेश परब रामचंद्र घाडीगावकर,संतोष देवळी,विनय परब,बाबा मेस्त्री,विनय मेस्त्री,बाळा सुभेदार आबा आचरेकर,विनोद परब,तसेच सर्व शिक्षक व सर्व टेंबवाडी ग्रामस्थ,मालोंड,बेलाची वाडी ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!