दिलेला शब्द पूर्ण केला;आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब-न्हिवे येथील श्री देव ब्राह्मण मंदिर सभामंडपासाठी १० लाख रु.निधी मंजूर

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य देण्याचा न्हिवे वासियांचा निर्धार

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कोळंब-न्हिवेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिराजवळ सभामंडप उभारावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी यांनी आमदार वैभव नाईक यांच्याजवळ केली होती. आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ याची दखल घेत १० लाख रु. निधी सभामंडपासाठी मंजूर करून दिला आहे. शुक्रवारी प्रत्यक्षात या कामाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.

कोळंब-न्हिवेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मात्र या ठिकाणी सभामंडप नसल्याने धार्मिक कार्यक्रम तसेच भोजन व्यवस्था करताना बिकट स्थिती निर्माण व्हायची त्यामुळे श्री ब्राम्हणदेव मंदिर येथे सभामंडप उभारण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी अनेक लोकप्रतिनिधींकडे करून सुध्दा त्यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर न्हिवेवाडी येथील युवकांनी, ग्रामस्थ व शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे सभामंडपाची मागणी केली असता निधी मंजुर करण्याचा शब्द देत त्यांनी तात्काळ या सभामंडपासाठी तब्बल १० रु. निधी मंजूर करून दिला त्याबद्दल ग्रामस्थांनी व शिवसैनिकांनी त्यांचे आभार मानत शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ. वैभव नाईक यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. यावेळी सभामंडपासाठी जागा उपलब्ध करून देणारे संतोष परब यांचेही ग्रामस्थांनी आभार मानले.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.आणि केवळ या सभामंडपाचे नव्हे तर मतदारसंघातील इतर अनेक विकासकामे येत्या काळात हाती घेऊन ती पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरोसकर,शहर प्रमुख बाबी जोगी, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, निखिल नेमळेकर, ग्रामपंचायत सदस्य नंदा बावकर, संजना शेलटकर, निकिता बागवे, स्वप्निल परब, संतोष परब, मीनल परब, राकेश लाड, रोशन नेमळेकर, प्रतीक पाताडे, चेतन परब, स्वप्निल परब, स्वप्निल दळवी, गुणेश गांगन, देऊ परब, अभिमन्यू परब, राजन दळवी, श्रीपाद नेमळेकर, श्रीधर परब, शेखर पाताडे, निर्मला गांगन, वैशाली परब, रेश्मा परब, विनिता परब, अरुण दळवी, रसिका दळवी, वैदेही पाताडे, प्रज्ञा परब, ललिता लाड, दर्शना प्रभूगावकर, सुप्रिया लाड, प्रणिता परब, मीनल परब आदी ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!