नालासोपारा(पूर्व) येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

१६ बौद्ध पंचायत शाखा व बौद्धचार्य संघ यांचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : बौद्धजन पंचायत समिती गट क्र.३६ अंतर्गत शाखा समन्वय समिती आणि बौद्धचार्य संघ,नालासोपारा पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बालाजी ओपन ग्राउंड नालासोपारा पूर्व येथे अशोक पां. कांबळे शेर्पेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमात १६ बौध्दजन पंचायत समिती शाखा आणि बौद्धचार्य संघ यांनी संयुक्तरित्या सहभाग घेतला होता.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाखा समानवय समिती मध्ये असणाऱ्या १५ शाखा क्र.४९२ / ५६९ / ५८९ / ६३८ / ६९५ / ७१४ / ७२२ / ७२४/७३२ /७३८ / ७५० / ७७९ / ८०७/८१७ / ८२१ आणि त्या शाखांचे पदाधिकारी यांनी अतिशय मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी केला.

प्रथमतः बौद्धाचार्य संघाने धार्मिक विधी घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वय समितीचे सरचिटणीस कमलाकर जाधव यांनी केले. तर प्रास्ताविक समन्वय समितीचे खजिनदार मंगेश मर्चंडे यांनी केले.या कार्यक्रमा करिता प्रमुख वक्ते म्हणून बौ.पं.समिती गट क्र.३६ चे गट प्रतिनिधी अजितभाऊ खांबे आणि प्रा.विद्याताई भोरजारे यांनी धम्म बंधू भगिनींना मोलाचं मार्गदर्शन केलं.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य अभियाणचे अध्यक्ष धनंजय गावडे यांनीही मोलाचं मार्गदर्शन करताना नालासोपारा हे ऐतिहासिक स्थळ असून या ठिकाणी डॉ बाबासाहेबांनी अनेकवेळा भेट दिलेली आहे.आशा ठिकाणी डॉ बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून आपण प्रयत्न करत आहात ते प्रयत्न आपण चालूच ठेवावे.जेव्हा जागेचा प्रश्न सुटेल तेव्हा लागणारा मदतीचा हात मी नक्कीच पुढे करिन.अशी ग्वाही देऊन सर्व धम्म बांधवाना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमा करिता सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते.शेवटी सरणतंय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
अशी माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक पां. कांबळे शेर्पेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!