रामचंद्र उर्फ दाजी सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कै. रामचंद्र पांडुरंग सावंत उर्फ दाजी (88) यांचे 13 ऑक्टोबर रोजी ब्रह्मनगरी फोंडाघाट येथे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी ब्रह्मनगरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कुर्ली-घोणसरी, फोंडा पंचक्रोशीतील शेकडो सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोक उपस्थित होते.

श्री. ब्राह्मणेश्वर मंदिर ब्रह्मनगरी या देवस्थानचे ते प्रमुख मानकरी होते. त्यांनी सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी केली होती. शांत व प्रेमळ स्वभावाने ते परिचित होते. घोणसरी थरमरवाडी – कुंभारवाडी येथील ते मुळ रहिवासी होते. कुर्ली-घोणसरी धरणामुळे विस्थापित झाल्यामुळे गेली 25 वर्षे ब्रह्मनगरी फोंडाघाट येथे वास्तव्य करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, जावई, भाऊ, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते जयवंत सावंत व राजेश सावंत ते वडील होते.

error: Content is protected !!