दुर्ग सिद्धगड येथे दसऱ्यादिवशी दुर्गपूजन
कणकवली (प्रतिनिधी) : विजया दशमीच्या – दसऱ्याच्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग – कणकवली तालुका मार्फत दुर्ग सिध्दगड येथे दुर्गपुजन आणि गडाला तोरण बांधणी करण्यात आले. त्या वेळी ओवळीये ग्रामपंचायत सरपंच संजना पडवळ,वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार सर याचं सहकार्य लाभले. गावातील शिवप्रेमी शिवशंबो युवक कला क्रिडा मंडळ चे अध्यक्ष अशोक लाड सह्याद्री प्रतिष्ठान चे दुर्गसेवक अजय गुरव, प्रविण लाड, प्रशांत गुरव, राजदीप पाटील उपस्थीत होते.गडावरील गोसावी पुजारी यांचा हस्ते पुजा करण्यात आली .