सकल मराठा समाजाच्या वतीने खारेपाटण येथे १९ ऑक्टोंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज यांच्या वतीने व खारेपाटण सिनियर कॉलेज एन एस एस विभागाच्या सहकार्याने शनिवार दि.१९ ऑक्टोंबर २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खारेपाटण प्पांच्क्रोशी सकल मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

खारेपाटण एस टी बस स्थानक शेजारी कोळसूलकर कॉम्प्लेक्स मध्ये हे रक्तदान शिबिर होणार असून सिंधुदुर्ग जिल्हा सिव्हील रुग्णालय ओरोस येथील रक्तपेढीचे डॉक्टर व त्यांची टीम या रक्तदान शिबिराला सहकार्य करणार आहेत.तरी खारेपाटण पंचक्रोशीतील रकातदाते युवकांनी व ग्रामस्थानी या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन शिबिर यशस्वी करावे असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व रक्तदात्यांना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!