बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन ‘ उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून १५ ऑक्टोबर, २०२४ या रोजी बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विविध उपक्रमाद्यारे वाचनाचे महत्व पटवून दिले गेले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुषपाजली अर्पण करून करण्यात आली. प्रशालेचे संस्कृत अध्यापक श्री. वळंजू सर यांनी डॉ.कलाम यांच्या जीवनातील वाचनाच्या भूमिकेबद्दल भाषण दिले. त्यांनी सांगितले की, डॉ. कलाम यांना वाचनाची खूप आवड होती आणि त्यांनी आपल्या जीवनातील यशाचे श्रेय वाचनाच्या सवयीला दिलं होतं. या निमित्त,’ पुस्तक चर्चा ‘ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यानी उत्साहाने या उपक्रमात भाग घेतला व आपल्या आवडत्या पुस्तकावर मते मांडली.

या दिनाची पूर्वतयारी म्हणून प्रशालेतील इयत्ता ७ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व विध्यार्थ्याना वागदे येथील,’ आर्यादुर्गा ग्रंथालयास ‘ दि.१४ ऑक्टोबर,२०२४ रोजी भेट देण्याची संधी प्रशालेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली. विद्यार्थ्यानी तिथे जाऊन पुस्तके वाचण्याची संधी घेतली. काहींनी नवीन पुस्तकांची नोंद करून ती वाचण्याचा संकलप केला.

या कार्यक्रमा प्रसंगी अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर मा.श्री.सुधीर सावंत यांनी मुलांना वाचनाचे महत्व पटवून दिले आणि विद्यार्थ्याना वाचनाची सवय लावण्यासाठी मार्गदर्शन केले. वाचनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास,विचारशक्ती व कल्पना शक्ती कशी वाढते हे देखील त्यांनी विद्यार्थ्याना समजावून सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी, मुख्य द्याधपकानी सर्व विद्यार्थ्याना दररोज किमान अर्धा तास वाचन करण्याचा संकल्प घ्यायला लावला. वाचन प्रेरणा दिवसाचा उत्सव विद्यार्थ्याना नव्या पुस्तकांच्या दुनियेत घेऊन गेला आणि वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रेरणा देऊन गेला

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी जाधव मॅडम यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर मा. श्री . सुधीर सावंत,संस्थेच्या सचिव सौ. सुलेखा राणे मॅडम, संस्थेचे इतर पदाधिकारी,प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनघा राणे मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांचे उत्कृष्ट असे सहकार्य लाभले. अशा प्रकारे बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये,’ वाचन प्रेरणा दिन ‘ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!