कणकवली (प्रतिनिधी) : सी आर चव्हाण यांची शिवसेना उबाठा अनुसूचित जाती मोर्चा कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव उपस्थित होते. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी शिवसेना (उबाठा) जिल्हा शाखा सिधुदुर्गची जिल्हा कार्यकारीणीची सभा अध्यक्ष संदेश पारकर यांचे अध्यक्षतेखाली,सतिश सावंत विधानसभा गटनेते,आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.या सभेत विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आखणी करण्यात आली.त्याचबरोबर काही महत्वाच्या कमिट्यांचीही रचना करण्यात आली .
यामध्ये अनु .जाती मोर्चाच्या कणकवली विधानसभा संमन्वयकपदी सी.आर.चव्हाण यांची निवड करण्यात आली.सी.आर.चव्हाण.हे शिवसेना (उबाठा).गटाचे सक्रीय व निष्ठावान कार्यकर्ते आहेत.तसेच ते संदेश पारकर यांचे विश्वासू व निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. कामाची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांना ही जबाबदारी दिली आहे.पद असो या नसो पण शिवसेनेचा निष्ठावान सैनिक म्हणून,पक्ष देईल ते काम करून,पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आणि पक्ष देईल त्या उमेदवारासाठी काम करून,विजयाचा वाटेकरी होणारअसेही सी.आर.चव्हाण.म्हणाले.ते प्रवासी संघ कणकवली या सघटनेचे सचिव ,भारतीय चर्मकार समाज या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष,माहिती अधिकार जनजागृती अभियान संस्था – महाराष्ट्र या संस्थेचे प्रदेश सचिव,म्हणूनही सक्रीय आहेत.मानवाधिकार संघटना-अध्यक्ष,ग्राहक पंचायत -संघटक,क्रास्ट्राईब ग्रामसेवक संघटना – सल्लागार या संघटनामध्ये सामाजिक कार्य करतात.