दोन्ही राणेबंधू विधानसभेत असतील – मंत्री उदय सामंत
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदारसंघात आता परीवर्तन अटळ आहे.भरघोस मतांनी निलेश राणेंना विजयी करत पुढील निवडणुकीत विरोधी उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे धाडस होऊ नये. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आणले. समोरची जमलेली गर्दी बघून मला विश्वास आहे की दोन्ही राणे बंधू महाराष्ट्र विधानसभेत असतील असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील महिला भगिनी ह्या महायुती च्या मागे ठामपणे आहेत.महिला भगिनींना Split बहीण योजना बंद होऊ नये म्हणून ठाकरे सेना, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात धाव घेतली.लाडक्या बहिणींना मिळणारा आर्थिक लाभ मिळू नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी ला घरी बसवा.35 दिवसानंतर जेव्हा महायुती चे सरकार येईल तेव्हा लाडकी बहीण योजना आणखी जोमात सुरू राहील असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.