आमदार वैभव नाईक यांच्याकडून चौके ग्रामपंचात इमारतीसाठी १० लाखाचा निधी

चौके (प्रतिनिधी) : कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या मालवण मतदारसंघातील चौके ग्रामपंचायत इमारत (सभागृह) बांधणे यासाठी आपल्या स्थानिक विकास निधी २०२२-२३ अतंर्गत १० लाख रुपये निधी मंजूर करण्याबाबतचे पत्र चौके सरपंच गोपाळ चौकेकर यांच्याकडे बुधवार दिनांक १५ मार्च रोजी सुपुर्द केले. यावेळी चौके ग्रामपंचायत उपसरपंच पी. के. चौकेकर, ग्रा, प. सदस्य दुलाजी चौकेकर, सामाजिक कार्यकर्ते बिजेंद्र गावडे, अजित पार्टे उपस्थित होते.

गेले काही वर्षे शासकीय जागेत असलेल्या चौके ग्रामपंचायत इमारत जागेचा वादावर कोर्टाचा निकाल लागल्यानंतर निधी अभावी इमारत बांधकाम थांबले होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावपँनल ने ही सुसज्ज इमारत बाधणे हा विषय प्रामुख्याने घेतला होता. लोकनियुक्त सरपंच गोपाळ चौकेकर व गावपँनल यांनी निधीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार केला होता. यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आपला स्थानिक निधी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यासाठी पत्र चौके सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्याकडे सूपुर्द केले. याबरोबरच इमारतीसाठी लागणारा निधी अन्य लोकप्रतिनिधी कडून उपलब्ध करून लवकरच ग्रामपंचायत इमारत उभी राहणार असल्याचे सरपंच गोपाळ चौकेकर उपसरपंच पी. के. चौकेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!