जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
उद्योजक विशाल परब यांनी दिली सदिच्छा भेट
कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शशिकांत इंगळे मित्रमंडळाच्या वतीने कणकवली येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि केक कापून करण्यात आले.
यावेळी उद्योजक विशाल परब यांनी हजेरी लावली. तसेच नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक अभिजीत मुसळे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभूगावकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे उपस्थित होते. यावेळी बाबा परब यांनी शशिकांत इंगळे मित्रमंडळाने रक्तदान शिबिरसारख्या राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. उद्योजक विशाल परब यांनी यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवून समाजाला मदत करत चला. काही लागेल तर सहकार्य करायला मी तयार आहे, असे सांगितले.
शशिकांत इंगळे यांनी राणे कुटुंबीयातील सदस्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उत्सव आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवलेला आहे. यापुढेही असेच उपक्रम राबवून समाजाला अभिप्रेत असे काम करू तसेच सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला त्याबद्दल मित्रपरिवारचे आभार मानले.