तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा 100 टक्के संप

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद कर्मचारी “जुनी पेन्शन लागू करा” या मागणीसाठी एकवटले असून त्यानी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.आजचा तीसऱ्या दिवशीही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना एकत्र आल्या असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर गेले तिन दिवस धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी मोठ्या संखेने सहभागी झाले आहेत.

जुनी पेन्शन मिळावी. या प्रमुख मागणीसह कर्मचाऱ्याच्या विविध मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. याबाबत आंदोलन स्थळी चर्चा झाली. प्रत्तेक संघटनाचे पदाधिकारी शासनाच्या कर्मचारी धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत होते. तर जो पर्यंत जुनी पेंशन लागु करण्या बाबत शासन निर्णय घेत नाही तो पर्यंत संपातुन माघार घेणार नाही असा निर्धार कर्मचारी संघटनानी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!