पोलीस बंदोबस्तात हायवे प्राधिकरण राबवणार मोहीम
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील हायवे उड्डाणपुलाखालील स्टॉल हटाव मोहीम उद्या 17 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पोलीस बंदोबस्तात नॅशनल हायवे प्राधिकरण कडून राबवली जाणार आहे. शहरातील पटवर्धन चौकासह उड्डाणपुलाखालील अन्य ठिकाणचे स्टॉल पोलीस बंदोबस्तात हटवले जाणार आहेत. यासाठी 2 पोलीस अधिकारी , 10 पोलीस अंमलदार यांच्यासह शीघ्र कृतिदलाच्या एक तुकडीचा स्टॉल हटाव मोहिमेवेळी बंदोबस्त असणार आहे.